नवरगाव येथील नागरिकांनी केले १ तास श्रमदान

220

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १ ऑक्टोबर : तालुक्यातील ग्राम पंचायत नवरगाव अंतर्गत आज १ ऑक्टोबर ला १तारीख,१ तास महा श्रमदान निमित्य नवरगाव, राजोली, येरंडी,भुरांनटोला या चारही गावात गावातील रस्ते, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत कार्यालय परिसर, अंगणवाडी परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली.
यात ग्राम पंचायत नवरगावचे सरपंचा सौ. रंजनाताई शिडाम उपसरपंचा कु. लक्ष्मी झित्रु कोवा, सचिव खुशाल नेवारे, ग्राम पंचायत सदस्य -कपील कोवा, मुन्ना गेडाम, बिसन हलामी, रोशनी कोकोडे, रेशमीला मडावी,रूपाली कोरचा, सर्व आशा वर्क, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट महिला, गावकरी, पुरुष, महिला, युवक, युवती, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनि,सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित राहून श्रमदान १ तास करून गाव सर्व स्वच्छ केले व नियमित १५ दिवसातून गाव स्वच्छता करण्याचे ठरविले असून शपथ घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here