गडचिरोली वनविभागाने राबविला ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम

256

The गडविश्व
गडचिरोली, १ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘ स्वच्छता ही सेवा-अभियान’’ या उपक्रमांतर्गत गडचिरोली वनविभागाच्या वतीने ‘एक तास स्वछतेसाठी’ उपक्रम राबवून उप वनसंरक्षक कार्यालय तसेच मुख्य वनसंरक्षक कार्यालय परिसरात स्वछता अभियान राबवून परिसराची स्वछता करण्यात आली.
या अभियानात रमेश कुमार वनसंरक्षक गडचिरोली यांनी सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला तसेच उप वनसंरक्षक मिलिष शर्मा, सहायक वनसंरक्षक करिश्मा कवडे, वन परिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम , वनपाल, वनरक्षक,गडचिरोली वनपरिक्षेत्रातील तसेच उपवनसंरक्षक कार्यातील सर्व कर्मचारी, वनमजुर, आर आर टी चमू , टायगर मोनिटरिंग चमू चे सदस्य सहभागी झाले होते.
सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगीतले व आपल्या सभोवताल स्वच्छता राखणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे. तसेच आपले शरीर निरोगी राहावे व आपल्या आजुबाजुच्या परिसरात रोगराई निर्माण न होऊ देता प्रत्येकजणांनी आपले घर व घराच्या आजुबाजुचे परिसर दररोज स्वच्छ करावा, असे सांगीतले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘स्वच्छ भारत दिवस’च्या निमित्याने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर रोजी देशभरात व्यापक स्वरूपात ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे केंद्र शासनाचे निर्देश होते. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली वनविभागा तर्फे आज १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता पासून सदर उपक्रम राबविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here