The गडविश्व
गडचिरोली, दि.१९ : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विशेष प्रयत्नातून विसापूर रैतवारी ग्रामपंचायत अंतर्गत अनंतपुर, रेखेगाव, सिताटोला निमडर टोला, कुदुर्शी टोला, पदाटोला विसापूर, हिवरगाव व कोर्धा येथे ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले.
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधी, खणीकर्म, दलित वस्ती, तांडा वस्ती, 25 15 व नागरी सुविधा अंतर्गत कामांचा समावेश आहे.
यावेळी सरपंच गौराबाई गावडे, उपसरपंच काशिनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युमो महामंत्री यश गण्यारपवार, पुष्पाबाई हेडो, विलास सातपुते, गणेश गावळे, रोशन बारसागडे, इंदल रबडे, गुरूदास गलाई, गिरमा दूधबावरे, तुळशीराम बुरांडे, गुरूदास बारसागडे, गिरीश पाटील, गणेश गावळे, विलास सातपुते, देवराव हेडो उपस्थित होते.
