आविका संस्थेच्या समस्या मार्गी लावण्याकरीता शासन स्तरावर पाठपूरावा करणार 

169

– खा.डाॅ.किरसान यांचे गोठणगांव येथे प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : आविका संस्था मार्फत या परिसरात हमीभाव धान खरेदी योजना राबविण्यात येते मात्र काही अडचणी व समस्यामुळे या संस्था आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत या समस्या मार्गी लावण्याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करीत समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन खा.डाॅ.नामदेव किरसान यांनी केले.
गोठणगांव येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा वतीने गुरुवार १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता खा.किरसान यांचा जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आदिवासी उपयोजना क्षेत्रात शासकीय हमीभाव धान खरेदी योजना, आदिवासी विकास महामंडळाचा उप अभिकर्ता म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था राबवित असते मात्र सदर योजना राबवित असताना धानाची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन महिण्याचा आत मालाची उचल करण्याचे निर्देश आहेत मात्र शासनाकडून मालाची उचल वेळेत होत नाही. अनेक संस्थाकडे स्वतःचे गोडावून नाही, उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आलेल्या मालात तूट निर्माण होते. ही घट तूट फक्त अर्धा टक्का मान्य करण्यात येते मात्र तूट ही अधिक राहत असल्याने याचा भूर्दंड संस्थावर बसतो व संस्थाची खरेदीवरील कमीशनची रक्कम थकविण्यात येत असल्याने अनेक संस्था आर्थिक डबघाईस आलेल्या आहेत ही प्रमूख समस्या संघटनेचा वतीने खा.किरसान यांच्या समक्ष मांडण्यात आली.
यावेळी धानाची उचल विहीत मुदतीत व्हावी व संस्थाची कमीशनची रक्कम मिळावी याकरीता शाशनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यानी दिले. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बूल्ले, सेवानिवृत उपविभागीय अभियंता माधव गावळ, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, आनंदराव जांभूळकर आविका संस्था गोठणगावचे सभापती यशवंत पाटील चौरीकर, आंधळी सभापती केशव किरसान सोनसरी, सभापती प्रभाकर जूमनाके, येगंलखेडा सभापति अंबरशहा पारसे, कुरखेडा सभापति बाबूराव तूलावी तसेच मोठ्या संख्येत आविका संस्था पदाधिकारी व कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आविका उपसभापति विनोद खुणे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन मानिक दरवडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here