लांब पल्ल्याच्या बसेस जास्तीत जास्त सोडा

54

– रायुकॉ गडचिरोली जिल्हा विधान सभा अध्यक्ष रुपेश वलके यांची गडचिरोली आगार व्यवस्थापकास निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २४ मार्च : गडचिरोली येथून चालत असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस जास्तीत जास्त सोडण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस गडचिरोली जिल्हा विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी गडचिरोलीचे आगार व्यवस्थापक यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली ते नागपूर गडचिरोली ते संभाजीनगर गडचिरोली ते वर्धा, गडचिरोली ते यवतमाळ, गडचिरोली ते चिमूर, गडचिरोली ते सिरोंचा, गडचिरोली ते भामरागड, गडचिरोली ते एटापल्ली, गडचिरोली ते पाखरांजुर, गडचिरोली ते कोरची अशा मागील चालत आलेल्या मार्गावरील बंद करण्यात आलेल्या पूर्ण जुने शेड्युल पुरवत करण्यात यावे धानोरा नागपूर, चामोर्शी नागपूर, घोट नागपूर, काटोल नागपूर, मार्कंडा नागपूर, बोरी गडचिरोली, एटापल्ली गडचिरोली, जरावंडी गडचिरोली, पेंढरी गडचिरोली, मानपुर गडचिरोली, मुरूमगाव गडचिरोली आणि अशा अनेक लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसेसची संख्या पूर्वीप्रमाणे पूर्ववत करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना गडचिरोली शहरातून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जाणे येणे सोयीस्कर होईल असे नियोजन करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, मनोज बेसरकर, विनोद सहारे, हेमराज लांजेवार, विवेक कांबळे, अक्षय मेश्राम, समीर भांडेकर, बाबूलाल रामटेके व अन्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here