The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे), ४ ऑक्टोबर : कुणबी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी पालोरा या गावात कुणबी समाजाची सभा घेण्यात आली.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व महामोर्चात सहभागी व्हा आणि संघर्ष करा असे आवाहन करण्यात आले.
सभेला मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी. नरुले, निखिल धार्मिक, विजय पत्रे, नंदु नाकतोडे, शालिकराव पत्रे, रोहणकर, गोलु वाघरे, मनोज मने, चेतन भोयर, आदींनी मार्गदर्शन केले व पालोरा येथील कुणबी समाजाचे पदाधिकारी, विलास हारगुडे, नरेश ढोरे, संजय धोटे, वैभव कुथे, अशोक हारगुडे, सुरज पिलारे, भाऊराव धोटे, जितेन्द्र प्रधान, क्रिष्णा खरकाटे, सागर हारगुडे, सुनिल प्रधान,व शेकडो कुणबी समाजबांधव उपस्थित होते.