– २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येईल
The गडविश्व
गडचिरोली, १३ फेब्रुवारी : अनुसूचित जमाती व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना शेळी गट वाटप करण्यात येणार असून प्रकल्प कार्यालय,गडचिरोली,करीता १३८ लाभार्थ्यांकरीता ३१. ८२ लक्ष निश्चिीत करण्यात आलेली आहे. या कार्यालया अंतर्गत येत असलेले गडचिरोली,चामोर्शी,धानोरा,आरमोरी,कुरखेडा,वडसा,कोरची, तालुक्यातील वनहक्क कायदाद्वारे वनपट्टा प्राप्त झालेले अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी शेळी गट मिळण्यासाठी अर्ज २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास,प्रकल्प,गडचिरोली येथे सादर करावे.
योजनेच्या अटी शर्ती:- लाभार्थी हा अनुसूचित जमाती व वनपट्टेधारक असावा,वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र,शेळायांना पिण्याच्या पाणी उपलब्ध असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक आहे, वनपट्टेधारक शेतकरी अथवा त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी सदर योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागामार्फत घेतलेला नाही.याबाबतचे सक्षम प्राधिकार/संबंधित ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक आहे.
वनपट्टेधारक शेतकरी यांना मिळालेले शेळीगटाची विक्री करता येणार नाही किंवा एकाच लाभधारक कुटूंबाकडे एकापेक्षा अधिक लाभधारकांचे पशु एकाच ठिकाणी संगोपित केली जाणार नाही.वनपट्टेधारक शेतकरी यांनी अटी व शर्तीनुसार रुपये १००/- मुद्रांकावर करारनामा करुन देणे बंधनकारक राहिल, तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,डॉ.मैनक घोष यांनी केले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)