-मेंढा येथील ग्रामसभेत निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, ६ मार्च : होळीच्या सणानिमित्त इतर गावाहून दारू पिऊन गावात प्रवेश करणाऱ्या मध्यपींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मेंढा येथील ग्रामसभेत घेण्यात आला.
मेंढा गावात अवैध दारूविक्री बंद असूनही गावातील काही नागरिक इतर गावाहून दारू पिऊन येतात. त्यामुळे या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंढा येथे आयोजित ग्रामसभेत गाव संघटन समिती गठीत करण्यात आली. सोबतच विविध निर्णय घेण्यात आले. यात होळीच्या दिवशी गावातील महिला रस्ता-रस्त्यावर फिरून दारू पिऊन येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, ज्या गावातून दारू पिऊन आले त्या गावाची चौकशी करून अहिंसक कृती करणे आदी निर्णय घेण्यात आले.
यावेळी जेष्ठ आदिवासी समाजसेवक देवाजी तोफा, सरपंच नंदा दुगा, ग्राम समिती अध्यक्ष अलीराम हिचामी, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश नैताम, नरेश किरंगे, कमलाबाई तोफा, ललिता दर्रो, पुष्पक कोरेटी, सिंधू दुगा, वैशाली आतला, रुपाली करंगामी यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
(The gadvishva) (The gdv) (Muktipath) (mendha gramsabha) (holi 2023) (Gadchiroli news)