धानोरा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर प्रगती पॅनलची एकहाती सत्ता

1116

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ मार्च : तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था मर्यादित धानोरा र .न . ७०१ यांची संचालक मंडळाची निवडणूक ,रविवार ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळात डी.एड. कॉलेज धानोरा येथे पार पडली. या निवडणूकीत प्रगति पँनलने दणदणित विजय मिळवित एक हाथि सत्ता कायम ठेवण्यात यश मिळाले. १५ सदस्य असलेल्या असलेल्या प्राथमिक तालुका सह.पतसंस्थेत सर्वसाधारण, गटातुन १०उमेदवार, इतर मागास वर्गातून १, अनुसुचित जाती/जमाति गटातुन १ विमुक्त /भटक्या गटातुन १ तर महीला गटातुन २ उमेदवार निवडून द्यावयाचे होते. प्रगती पॅनल ने पंधराही उमेदवार उभे केले होते. तर समता पॅनल ने सर्वसाधारण गटातून १० पैकी ९ उमेदवार केले होते. प्रगती पॅनलचे १५ तर समता पॅनल ने १४ उमेदवार उभे केले. त्यापैकी समता पॅनलला धुव्वा उडाला असुन त्यांना एकही उमेदवार निवडून आनता आलेला नाही. माजी अध्यक्ष डंबाजी पेंदाम यांच्या नेतुत्वात एकतर्फी विजय मिळवीत आपले निरविवाद वर्चस्व सिद्ध केले. प्रगती पॅनल चे माजी अध्यक्ष डंबाजी पेंदाम यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले कि पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून सर्व शिक्षक मतदारांनी आमच्या वर विश्वास दाखवत भरभरून मतदान करून आम्हाला निवडून दिले. या पुढेही आम्ही शिक्षकांसाठी काम करू असे आश्वासन दिले. व सर्व शिक्षक मतदाराचे आभार मानले.
प्रगती पॅनल च्या अनु. जाती/ जमाती संवर्गातून सोमेश कालिदास दुगे यांना २६८, भटक्या जाती प्रवर्गातून प्रशांत गणपत काळे २७९, इतर मागास प्रवर्गातून अरुण रुषि सातपुते २६२, महिला राखीव गटातून सुनिता दयाराम मडावी २५६, कमल फागुजी गावळे २५८ , सर्वसाधारण गटातून ओमप्नकाश वासुदेव सिडाम २८२ मते, डंबाजी डोनुजी पेंदाम ३०६, हेमंत देवराव काटेंगे २४५, विलास मनिराम दरडे २४८, शाहू दुर्गुजी दुगा २३२, मनोज रामसाय नाईक २३२, रमेश आसाराम बघेल २४०, खूशाल सुकाजी भोयर २७२, सुरेश भगवान मडावी २७४, दिलीप केशरी सडमाके २५ यापैकी डंबाजी पेंदाम ह्यांना सर्वात जास्त ३०६ मते मिळाली ते प्रगती पॅनल चे माजी अध्यक्ष होते.
या सर्व निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणूनएस.जी. गोवर्धन सहाय्यक अधिकारी उच्च श्रेणी अधिकारी धानोरा यांनी काम पहिले.

(The Gadvishva) (The gadv) (gadchiroli news) (dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here