The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : अहेरी तालुक्यातील तलवाडा येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित अवैध दारूविक्री विरोधात महिला-पुरुषांनी शक्तिप्रदर्शन केले.
दुर्गम भागात वसलेल्या तलवाडा परिसरात अवैध दारूविक्री सुरु असल्याने युवा पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याची बाब निर्दशनास आली. त्यामुळे दारूविक्री थांबविण्यासाठी लढा देण्याकरिता गावातील महिला-पुरुष, युवक-युवती मुक्तिपथ गाव संघटनेत सहभागी व्हावे, यासाठी मुक्तीपथ व गाव संघटनेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. त्यानंतर स्पर्धेचे रूपांतर सभेमध्ये करून अवैध दारूविक्रीमुळे गावाचे होणारे नुकसान, दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. सोबतच दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना व्यसन उपचार शिबिराच्या माध्यमातून उपचार घेण्याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुक्तीपथ गावसंघटन अध्यक्ष अंगणवाडी सेविका सुमन पडोळे, बिनता हलदार, मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकार, मुक्तीपथ कार्यकर्ता भूषण गौरी यांच्यासह गाव संघटनेचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.