वाचन आणि खेळ हा विद्यार्थ्यांच्या यशाचा मुलमंत्र : पोलीस अधीक्षक नीलोत्पल

190

– कारवाफा येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय उद्घाटन व लोकार्पण सोहळा आणि जनजागरण मेळावा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकें हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षीत होवू नये. तसेच त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / प्रादेशिक / स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पोस्टे कारवाफा परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातुन कारवाफा येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली. सदर वाचनालयाचे आज ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे हस्ते उद्घाटन व लोकार्पन सोहळा पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास पोस्टे कारवाफा हद्दीतील ४०० ते ५०० च्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पोस्टे पासुन ते वाचनालयापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरुन शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरीकांसह ग्रंथदिंडी काढण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. व कारवाफाच्या महिला संरपंचा श्रीमती महानंदा आतला व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालयामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याकरीता विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेअर व बुक ठेवण्याचे कपाट व इतर पायाभुत सुविधेसह ५०० हुन अधिक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासोबतच आयोजीत जनजागरण मेळाव्यात उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना सायकल, नोटबुक, पेन्सील, शॉपनर इ. तसेच नागरिकांना स्प्रे पंप, धुर विरहीत शेगडी, लोणचे पापड किट, शासकिय प्रमाणपत्र यामध्ये जातप्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड इ. तसेच महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. यासोबतच श्रमदानातून उभारलेल्या वाचनालयामध्ये मेहनत घेतलेल्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पोस्टे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल सामन्याचे पोस्टे कारवाफा येथुन पहिल्या व्हॉलीबॉल सामन्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपले संबोधनातुन विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व वाचनाविषयीचे महत्व पटवून दिले. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी “एक गाव एक वाचनालय” ही संकल्पना मांडत आपल्या भाषणामध्ये सांगीतले की, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एकुण ६१ ठिकाणी वाचनालय उभारण्याचे उद्दीष्ट असल्याने आज ५६ व्या वाचनालयाचे पोस्टे कारवाफा येथे उद्घाटन पार पडले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी व भविष्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करुन या वाचनालयातून चांगले अधिकारी घडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेमधून दुर्गम भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळणार असून उत्कृष्ठ चांगल्या खेडाळूना प्रो-लीग संघांकडून खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच कारवाफा येथील संपूर्ण नागरिकांचे हार्दीक अभिनंदन करुन भविष्यात पोलीस प्रशासन आपल्या प्रत्येक कार्यात नेहमीच मदतीसाठी तत्पर असेन असे आश्वासन दिले.
सदर उद्घाटन सोहळ्यास पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी मयुर भुजबळ, राज्य राखीव पोलीस बल धुळेचे पोनि, सोनवले तसेच ग्रामपंचायत कारवाफाच्या महिला सरपंचा श्रीमती. महानंदा आतला मॅडम, उपसरपंच विजय बहीरवार तसेच पोस्टे कारवाफा हद्दीतील सरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व प्रतिष्ठित नागरीक तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी मयुर भुजबळ, पोस्टे कारवाफाचे प्रभारी अधिकारी सपोनि. शिंदे, पोउपनि वाळके व सर्व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here