The गडविश्व
गडचिरोली, २१ मार्च : चामोर्शी तालुक्यातील सगणापूर येथील एका विक्रेत्याकडुन देशी दारू जप्त करून गुन्हा दाखल केल्याची कारवाई चामोर्शी पोलिसांनी केली.
सगणापूर या गावात चार दारूविक्रेते अवैध व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिस, मुक्तीपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या चार दारू विक्रेत्यांच्या घराची तपासणी केली. दरम्यान, एका विक्रेत्याकडे १ हजार रुपये किंमतीच्या २० देशी दारूच्या निपा मिळून आल्या. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोबतच इतर विक्रेत्यांना नोटीस बजावून दारू विक्री करतांना आढळून आल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचे ठणकावून सांगितले. यावेळी बीट अंमलदार गणवीर, पोलिस शिपाई विनय मस्कर, मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे व गावातील महिला उपस्थित होत्या.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023) (Visit of Fant Funding Committee from Delhi to Chatgaon Gram Panchayat)