व्येंकटरावपेठा येथे भव्य विवाह सोहळा, ११८ जोडपी अडकले विवाह बंधनात

175

– आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ कंकडालवार मित्र परिवाराच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळा संपन्न
The गडविश्व
अहेरी, २१ मार्च : अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येथे आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळाच्या पुढाकारातून व्येंकटरावपेठा येथे सोमवार २० मार्च रोजी लक्ष्मी देवी बोनलू व ११८ जोडप्याच्या एकाच मंडपात सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
यावेळी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र, डोरले, वधू-वरांना नवे कपड़े, संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्टान भोजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या कडून सदर विवाह सोहळ्यात देण्यात आले. या लग्न सोहळ्याचा संपूर्ण खर्च कंकडालवार परिवाराकडुन करण्यात आला. तसेच या लग्न सोहळ्यात ७५ टक्के अनु.जमातीचे जोडपे होते तर उर्वरित अनु.जाती व इतर प्रवर्गतील जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत.
यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या सह मंचावर आविसचे नेते नंदूभाऊ मट्टामी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, रियाज शेख, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक विलास गलबले, नगरसेविका मीनाताई ओंडरे, जोतीताई सड़मेक, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके, माजी पंचायत समिती सदस्या सौ.शितल दुर्गे, योगीता मोहूर्ले, छाया पोरतेट, संगीता दुर्वा, इंदारामचे सरपंचा सौ.पेंदाम, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, दामरंचा सरपंचा सौ.किरण कोडापे, नागेपलीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच वैभव कंकडालवार, उपसरपंच शानगोंडावार, उपसरपंच हरिष गावडे, माजी सरपंच गुलाब सोयाम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी उपसरपंच जगनाथ मडावी, सौ. मीना गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येकाटरावपेठा, माजी सरपंचा सुंगधा मडावी, माजी सरपंचा सरोज दुर्गे, माजी सरपंच जे.टी.मडावी, आई माया कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार आदि मंचावर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
सदर विवाह सोहळ्याला हज़ारोंच्या संख्यांनी आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वऱ्हाडी उपस्थित होते.
यावेळी लग्न सोहळ्याच्या यशस्वीसाठी (नरेश) नरेंद्र गर्गम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, शामराव राऊत, शंकर सिडाम, जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार, तेजू दुर्गे, प्रमोद कोडापे, आदिनी सहकार्य केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रज्वल नागूलवार, किशोर दुर्गे, निरंजना वेलादी, शंकर सिडाम, दिलीपजी गर्गम, राजु सिडाम, शामराव राऊत, माधव राऊत, रवी कुळमेथे, महेश दहागावकर हरिबाबा राऊत, रवी सडमेक, रमेश सोयाम, वसंत गेडाम,राकेश चिंचोलकर, सुरेंद्र गर्गम, महेश कुळमेथ, साई सडमेक बापू आलम, अविनाश गेडाम, यांनी केली. यावेळी गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले व हज़ारोंच्या संख्यांने उपस्थित राहून वधू-वरांना मंगलमय शुभाशीर्वाद दिले.

सदर लग्न सोहळा दोन वर्षापुर्वी नियोजन केले होते. मात्र कोरोना संकटामुळे घेता आला नाही. दरवर्षी व्येंकटरावपेठा येथे लक्ष्मी देवी बोनलू येरमा परिवाराकडुन साजरी केली जाते. यावेळी ११ जोडपे विवाह करू द्यावी असे परिवाराकडुन ठरले होते. मात्र ११८ जोडपे तयार झाले असून सर्व जाती धर्मांचे जोडपे असून कसलाही भेदभाव केलेला नसून सर्वांच्या मदतीने सहकार्याने योग्य पद्धतीने विवाह सोहळा पार पडले . तसेच येणाऱ्या काळाता यापेक्षा मोठा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येईल.
– आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ कंकडालवार मित्र परिवार

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023) (Visit of Fant Funding Committee from Delhi to Chatgaon Gram Panchayat) (118 couples got stuck in marriage in Venkataravpetha) (Jay Kankadalwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here