चिमूर : शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळला

8

चिमूर : शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळला
– मृताची ओळख व मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट
The गडविश्व
ता.प्र/ चिमूर, दि. २८ : तालुक्यातील अडेगाव ते बाम्हणी-चिमूर मार्गालगतच्या शेतशिवारात बुधवारी (२८ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
शेतातील एका झाडाला इसमाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, मृताच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत मृताची ओळख पटलेली नव्हती. तसेच, मृत्यूमागील नेमके कारणही स्पष्ट झाले नव्हते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chimurnews #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here