गडचिरोलीत आज रोकडे ज्वेलर्सचा भव्य शुभारंभ; अभिनेत्री शिल्पा शिंदे राहणार उपस्थित

75

गडचिरोलीत आज रोकडे ज्वेलर्सचा भव्य शुभारंभ; अभिनेत्री शिल्पा शिंदे राहणार उपस्थित
– शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : शहरातील चंद्रपूर रोडवर रोकडे ज्वेलर्स या दागिन्यांच्या दालनाचा शुभारंभ आज गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. जिंजर हॉटेलच्या बाजूला आणि हॉटेल लँडमार्कसमोर असलेल्या या दालनाच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री शिल्पा शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सन १९०२ पासून परंपरा जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्सने शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्क्यांपर्यंत, तर डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. याशिवाय, सोने, डायमंड, सिल्व्हर आणि प्लॅटिनम ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर प्रत्येक खरेदीसाठी २५ टक्के गिफ्ट व्हाउचर देण्याची ऑफरही जाहीर करण्यात आली आहे.
या सवलती १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान उपलब्ध राहणार आहेत. गडचिरोली शहरात सुरू होणाऱ्या या नव्या दालनामुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या सोन्या-चांदीसह हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ऑफर्ससाठी अटी व शर्ती लागू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here