भंडारा : बोलेरो ट्रकला धडकली,चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू

64

भंडारा : बोलेरो ट्रकला धडकली,चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू
– नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगावजवळ शुक्रवारी पहाटे दुर्घटना, १३ जण जखमी
The गडविश्व
भंडारा, दि. १२ : जिल्ह्यात नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चिमुकल्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव बोलेरो वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बोलेरोमधून प्रवासी प्रवास करत होते. पिंपळगावजवळ पेट्रोल पंप परिसरात ट्रक महामार्गालगत असताना भरधाव बोलेरोने त्याला पाठीमागून धडक दिली. अपघाताची तीव्रता लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व प्रशासनाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांसह महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये जामबाई रामावतार वर्मा (५०), मीनाक्षी राजकुमार वर्मा (२६), गायत्री रूपेश उईके (३०), स्विटी रूपेश उईके (६), धैर्य रूपेश उईके (४), सरिता विजय वर्मा (३०), ग्रीशा राजकुमार वर्मा (२) आणि राजकुमारी प्रल्हाद पटेल (३५) यांचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतांश जण छत्तीसगडमधील विविध भागांतील रहिवासी असल्याची माहिती आहे.
जखमींमध्ये सुभाष विजय वर्मा (५), गुलशन रमेश वर्मा (१८), ललिता योगेश पटेल (२६), तन्मय योगेश पटेल (३), गणेशिया अश्वंत पटेल (२२), रमय्या खोजलर पटेल (२१), रामप्यारी भारत पटेल (४५), मयंक योगेश पटेल (६), रितेश विजय वर्मा (३), मेघा राजकुमार वर्मा (३), लोकेश असवन पटेल (सुमारे ९), डॉली असवन पटेल (सुमारे ७) आणि रामकुमारी दुलारी पटेल (३०) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. बोलेरो चालकाचा वेग, ट्रकची महामार्गावरील स्थिती आणि अपघातामागील नेमके कारण याचा तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #bhandaranews #accident #bolero

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here