अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू
– नवजात अतिदक्षता विभागातील दुर्घटनेने खळबळ; सहा अर्भकांवर उपचार सुरू
The गडविश्व
अमरावती, दि. २४ : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सहा अर्भकांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले असून काही बालकांना भाजल्याची प्राथमिक माहिती आहे.
तिसऱ्या मजल्यावरील एका नवजात अतिदक्षता कक्षात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या कक्षात १२ बालके उपचार घेत होती. आग लक्षात येताच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढण्याची धावपळ केली. मात्र, तीन चिमुकल्यांचा जीव वाचवता आला नाही.
या घटनेनंतर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगीनंतर अग्निशमन यंत्रणा वेळेत का कार्यान्वित झाली नाही, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला आणि सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कुठे त्रुटी राहिली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #AmravatiFire #AmravatiNews #HospitalFire #MaharashtraNews #BreakingNews #FireIncident #NewbornBabies #HospitalSafety #AmravatiHospital #LatestNews #Maharashtra #NewsUpdate #TheGadVishva













