आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २२ : आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी सरपंच उज्वला रायसिडाम, माजी उपसरपंच अप्रव भैसारे, माजी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पुसाम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जितेंद्र कराडे, काँग्रेस बूथ प्रमुख भास्कर पुसाम, काँग्रेसचे राजकुमार जनबंधू, महागू भानारकर, राजू बोदेले यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.













