गाढ झोपेत काळाचा घाला! हॉटेलला भीषण आग; ६ पर्यटकांचा होरपळून मृत्यू

31

गाढ झोपेत काळाचा घाला! हॉटेलला भीषण आग; ६ पर्यटकांचा होरपळून मृत्यू
– तळमजल्यावर आग लागल्याने बाहेर पडण्याचे मार्ग झाले बंद; अनेक जण गंभीर जखमी
The गडविश्व
बीरभूम, दि. १७ : पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ तारापीठ येथे सोमवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. तारापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘विदिशिनी’ या खासगी हॉटेलला अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने हॉटेलमध्ये झोपलेल्या पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
तारापीठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर आणि तलावाजवळ ‘विदिशिनी’ हॉटेल आहे. सोमवारी पहाटे हॉटेलच्या तळमजल्यावर अचानक आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आग संपूर्ण तळमजल्यावर पसरली आणि धुराचे लोट हॉटेलच्या इतर भागांत पोहोचले.
हॉटेलमध्ये रात्रीच चेक-इन केलेले अनेक पर्यटक गाढ झोपेत होते. तळमजल्यावर आग लागल्याने बाहेर पडण्याचे मार्ग अडथळ्यात आले. त्यामुळे अनेक पर्यटक हॉटेलमध्येच अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करत हॉटेलमधील अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
मात्र, या दुर्घटनेत सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. आगीत गंभीर जखमी झालेल्या इतर पर्यटकांना तातडीने रामपूरहाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच तारापीठ आणि रामपूरहाट पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून हॉटेलमधील अग्निसुरक्षा व्यवस्था, विद्युत यंत्रणा आणि सुरक्षेच्या इतर उपाययोजनांची तपासणी केली जात आहे. या भीषण दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thagadvishva #gadchirolinews #BreakingNews #LatestNews #IndiaNews #NewsUpdate #ViralNews #Tarapith #WestBengal #Birbhum #HotelFire #FireAccident #HotelFireAccident #BreakingNews #WestBengalNews #BirbhumNews #TarapithNews #FireTragedy #TouristDeath #BreakingNewsIndia #IndiaNews #LatestNews #FireIncident #TragicAccident #NewsUpdate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here