गडचिरोलीत ‘स्किल गॅप सर्वेक्षणा’ला सुरुवात; युवकांच्या कौशल्यांना मिळणार रोजगाराची दिशा

7

गडचिरोलीत ‘स्किल गॅप सर्वेक्षणा’ला सुरुवात; युवकांच्या कौशल्यांना मिळणार रोजगाराची दिशा
– रोजगाराच्या अपेक्षा, प्रशिक्षणाच्या गरजा जाणून घेणार;विद्यार्थी, युवक व उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्ह्यातील युवक-युवतींची कौशल्ये, रोजगाराच्या अपेक्षा आणि उद्योगांच्या गरजांनुसार आवश्यक प्रशिक्षण यांचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ‘स्किल गॅप सर्वेक्षणा’ला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली महास्ट्राईड गडचिरोली टीम आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात औद्योगिक व रोजगाराच्या संधी वाढत असताना स्थानिक युवकांकडे असलेली कौशल्ये आणि उद्योग-व्यवसायांना आवश्यक असलेली कौशल्ये यातील अंतर भरून काढणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने सर्वेक्षणाद्वारे युवकांच्या रोजगारविषयक अपेक्षा, प्रशिक्षणाच्या गरजा आणि भविष्यातील कौशल्य विकासासाठी आवश्यक बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे.
या सर्वेक्षणात विद्यार्थी, रोजगाराच्या शोधात असलेले युवक-युवती, कार्यरत व्यावसायिक तसेच उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांनी उपलब्ध करून देण्यात आलेला QR कोड स्कॅन करून सर्वेक्षण पूर्ण करावे.https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdIrp8ikE2XfOmIJhbkcl8YMoSLzTzSih_Q-69fhPRoprDg5g/viewform सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील युवकांच्या कौशल्यांची सद्यस्थिती आणि रोजगार क्षेत्रातील अपेक्षा स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. तसेच युवकांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here