मुनघाटे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

55

मुनघाटे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा 
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २२ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली संचलित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्याभारती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रा. तिरुपती बोरकर यांनी विद्यार्थी, स्वयंसेवक व उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी भ्रामरी, अनुलोम-विलोम, कपालभाती प्राणायाम, ताडासन, शवासन आदी योगप्रकारांचे महत्त्व विशद करत योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच “करो योग, रहो निरोग” हा आरोग्यदायी जीवनाचा संदेश देत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here