पीएम-किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण ; देसाईगंज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

97

पीएम-किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण ; देसाईगंज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. २१ : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत 23 व्या हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शनिवारी (दि. 20 जून) देसाईगंज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, कोंढाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या निधी वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी विकास योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कृषी सेवा, आधुनिक शेती तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी आणि कृषी व्यवसाय वृद्धीसाठीच्या उपक्रमांचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.
देसाईगंज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे सदस्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे. अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यास आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास कंपनीचे अध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here