राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी गडचिरोलीच्या खेळाडूंची निवड
– जिल्हा संघ जळगाव येथे दाखवणार दमदार कामगिरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा २० ते २५ जून २०२६ या कालावधीत जळगाव येथे होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध वयोगटांतून जिल्हा संघात स्थान देण्यात आले आहे. कनिष्ठ, सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर गटातील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून जिल्ह्याच्या संघाकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कब्स क्लास मुले (U-11) गटातून कुश राकेश कोहपरे वजन गट २२ ते २४ कि.ग्रॅ., प्रथमेश श्रीकृष्ण जुवारे वजन गट ३० ते ३२ कि.ग्रॅ., कॅडेट मुले (U-13) गटातून राजवीर प्रकाश लेकामी वजन गट ३० ते ३२ कि.ग्रॅ, कॅडेट मुली (U-13) गटातून आध्या यशवंत कुरुडकर वजन गट ३४ ते ३६ कि.ग्रॅ. यांची निवड झाली आहे.
सब-ज्युनिअर मुले (U-15) गटात ईशान विनिश भांडेकर वजन गट ३३ ते ३५ कि.ग्रॅ., शिवांश शामराव उसेंडी वजन गट ४३ ते ४६ कि.ग्रॅ., विहान किशोर बोडकर वजन गट ४९ ते ५२ कि.ग्रॅ., अर्पित पंकज धुडसे वजन गट ३० ते ३३ कि.ग्रॅ., धनंजय गुणाजी धोटे वजन गट ५२ ते ५५ कि.ग्रॅ. यांना संधी मिळाली आहे. तसेच सब-ज्युनिअर मुली (U-15) गटामध्ये निधी भास्कर गोटा वजन गट ३५ ते ३७ कि.ग्रॅ, आदिती गिरीधर बांते वजन गट ४३ ते ४६ कि.ग्रॅ. यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षक पंकज मडावी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव यशवंत कुरुसकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे आवाहन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर एट्टी, असोसिएशनचे अध्यक्ष आमदार डॉ. मिलिंद नारोटे, उपाध्यक्ष मार्कंड मसरके, प्रशांत मंडकर, राजेश पेचे, प्रमोद भोयर, भिक्षण जुगाडे, उत्तम देशमुख, अंकित तेतलाम, प्रसाद पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव गौरवतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
#Gadchiroli #Boxing #StateLevelBoxing #Jalgaon #SportsNews #GadchiroliBoxingAssociation #BoxingChampionship #MaharashtraSports #YoungBoxers #SportsUpdate














