धानोरा–रांगी–ब्रम्हपुरी बससेवा तातडीने सुरू करा

17

धानोरा–रांगी–ब्रम्हपुरी बससेवा तातडीने सुरू करा
– कोरोनानंतर बंद झालेली एसटी अद्याप सुरू नाही
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०७ : धानोरा–रांगी–ब्रम्हपुरी मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची नियमित बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी धानोरा तालुक्यातील नागरिक व प्रवाशांकडून होत आहे. कोरोनाकाळात बंद झालेली ही बससेवा आजपर्यंत पूर्ववत न झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावर सध्या सार्वजनिक वाहतुकीचे कोणतेही नियमित साधन उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेकदा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे.
धानोरा तालुक्यातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच उपचारासाठी नागपूर व इतर ठिकाणी जाणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयांमध्ये ये-जा करणारे कर्मचारी व नागरिक यांनाही बससेवा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रवाशांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने धानोरा–रांगी–ब्रम्हपुरी मार्गावरील बससेवा नियमित सुरू करावी, जेणेकरून नागरिकांची होणारी हेळसांड थांबेल व सुरक्षित, स्वस्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here