खोब्रामेंढा यात्रेला निघालेल्या भाविकांवर संकट ; ट्रॅक्टर अपघातात ५ जखमी

26

खोब्रामेंढा यात्रेला निघालेल्या भाविकांवर संकट ; ट्रॅक्टर अपघातात ५ जखमी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०६ : खोब्रामेंढा येथील प्रसिद्ध व जागृत हनुमान मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला कसरबोडी गावाजवळ अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवार ०६ जून रोजी घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरिपुटोला येथील काही भाविक ट्रॅक्टरने खोब्रामेंढा येथे देवदर्शनासाठी जात होते. कसरबोडी गावाजवळ पोहोचताच ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टरमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
या अपघातात तुषार रस्से (२५), सुषमा गावळे (३५), उषा रस्से (४५), अंकरशहा सयाम (२५) आणि अनुसाबाई मोहूर्ले (६५) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमी इरिपुटोला येथील रहिवासी असून त्यांच्यावर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कसरबोडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ट्रॅक्टरखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर आलेल्या या संकटामुळे इरिपुटोला व परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here