वनपाल करमचंद ढवळे यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार

18

वनपाल करमचंद ढवळे यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १६ : धानोरा उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत रांगी वनविभागात कार्यरत असलेले क्षेत्र सहाय्यक (वनपाल) करमचंद व्ही. ढवळे यांना पदोन्नती मिळून परभणी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
रांगी वनविभागात आयोजित कार्यक्रमात ढवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवशंकर बी. कायते, रोहित पाटील, रोकडे, पवळ, लांडे, दहिकर साहेब, श्वेता कापकर, दिवाकर भोयर व देवराव कुनघाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एन. कोहळे यांनी केले, तर राऊत वनरक्षक यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here