गुणवंत विद्यार्थिनीचा शहर विचार मंचातर्फे सत्कार
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १६ : विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय, कूरखेडा येथील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी मंतशा सिराजखां पठाण हिने महाविद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल शहर विचार मंच, कूरखेडा यांच्या वतीने दि. १५ मे रोजी तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंतशा पठाण हिला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढा भरवून गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी तिच्या यशाचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, प्रा. किशोर खोपे, डॉ. प्रा. दशरथ आदे, उपसरपंच राम लांजेवार, डॉ. जगदीश बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, मधूकर बोबाटे, सिराज पठाण आदी उपस्थित होते.














