गडचिरोलीच्या सुचिता धकाते यांचा ‘अनसंग दैनंदिन हिरो’ सन्मानाने गौरव

21

गडचिरोलीच्या सुचिता धकाते यांचा ‘अनसंग दैनंदिन हिरो’ सन्मानाने गौरव
-चंद्रपूर येथे प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : आध्यात्मिक गुरू प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या जयंतीनिमित्त तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त आयोजित “अनसंग दैनंदिन हिरो सन्मान” कार्यक्रम चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. या प्रेरणादायी सोहळ्यात गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता उदय धकाते यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, वसंतराव थोटे, चंद्रकांत गुंडावार तसेच महाराष्ट्र अपेक्स मेंबर विश्वंभर कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. बालमुकुंद पालीवाल, अनिकेत दुर्गे, सौ. सुचिता धकाते (गडचिरोली), सौ. रूपाली पापडकर, डॉ. प्रेरणा चांडक आणि तानाजी बायस्कर यांचा समावेश होता.
व्यवसाय व समाजसेवा क्षेत्रात सुचिता धकाते, जयंत हटवार, डॉ. संजय सुपारे, डॉ. शीतल सुपारे, विश्राम होकम व विलासराव चितमलवार यांना गौरविण्यात आले. तर क्रीडा क्षेत्रात विनय कोवे, डॉ. अनिल निकोडे, नितेश खडसे, प्रेरणा गेडाम, यशवंत कुरुडकर, रुपाली पापडकर आणि युवा अनिकेत दुर्गे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सन्मानित व्यक्तींच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माधुरी दहिकर, अमोल दशमुखे, उदय धकाते, ऋषिकेश पापडकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here