जि.प. कनिष्ठ महाविद्यालय धानोरा चा निकाल 87.50 टक्के ; यशाची परंपरा कायम

37

जि.प. कनिष्ठ महाविद्यालय धानोरा चा निकाल 87.50 टक्के ; यशाची परंपरा कायम
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर तर्फे जाहीर झालेल्या इयत्ता १२ वीच्या ऑनलाईन निकालात जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा यांनी 87.50 टक्के निकाल नोंदवत यशाची परंपरा कायम राखली आहे.
यंदा महाविद्यालयातील एकूण 48 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 3 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर 34 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले आहे.
गुणानुक्रमात कु. चंदना श्रावण गवर्णा हिने 74.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. बादल दुर्योधन गुरनुले याने 65 टक्के गुणांसह द्वितीय, तर आशिक राजेंद्र गुरनुले याने 60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल हेमलता परसा (गटशिक्षणाधिकारी), व्ही. एम. सुरजुसे (मुख्याध्यापक), वेणूताई मशाखेत्री (अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती), जमीर कुरेशी (उपाध्यक्ष, शा. व्य. समिती) यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, ए. बी. कोल्हटकर, रजनी मडावी, डॉ. रश्मी डोके, बुरमवार, भोगे, मोहन देवकात्ते, पी. टी. शेंडे, कांचन दशमुखे, रेखा कोरेवार, प्रियंका आनंदवार, किरण दरडे, हरीश पठाण, भालेराव, ओम देशमुख, जयराम कोरेटी, भालचंद्र कोटगले तसेच पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #hscresult2026 #sscresult2026

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here