खुल्या मैदानात युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ ; गडचिरोलीत हत्येची चर्चा

102

खुल्या मैदानात युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ ; गडचिरोलीत हत्येची चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयालगतच्या खुल्या पटांगणात रविवारी (०३) सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात एकच गर्दी झाली.
मृत युवकाची ओळख हरबचन खन्ना पटवा (वय २४), रा. गोकुळनगर, गडचिरोली अशी पटली आहे. त्याच्या मृत्यूमागे संशयास्पद परिस्थिती असून, युवकाची अन्यत्र हत्या करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला.
मृतक हरबचन हा दारू विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या पश्चात वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार असून, अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमक्या कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #CrimeNews #MurderSuspect #DeadBodyFound #BreakingNews #MaharashtraNews #PoliceInvestigation #GadchiroliCity #LatestNews #YouthDeath #ForensicInvestigation #IndiaNews #ShockingIncident #OpenGroundCase #CrimeAlert

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here