गेवर्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

18

गेवर्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १४ : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेवर्धा येथे ‘भीम जन्मोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक एकात्मता, समता आणि मानवाधिकारांचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगदिश बोरकर होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव करताना सांगितले की, “मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित आणि समाजसुधारक म्हणून बाबासाहेबांचे कार्य प्रेरणादायी आहे. शोषित, वंचितांच्या जीवनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे ते खरे प्रकाशसूर्य होते.”
कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. पुंडलिकजी नेवारे महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद, सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत नागीलवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू बारई, माजी सरपंच हेमंत शिडाम, पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सूत्रसंचालन हेमंत मेश्राम यांनी केले, तर प्रास्ताविक खुशाल रामटेके यांनी मांडले. आभार प्रदर्शन नेपाल जनबंधू यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश इंदुरकर, मनोज ढवळे, नरेश अंबादे, राष्ट्रपाल बांबोळे, सिद्धार्थ जनबंधू, अतुल अंबादे, आरती ढवळे यांच्यासह समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास गावातील सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here