धानोरा येथे जागतिक होमिओपॅथिक दिन उत्साहात साजरा

23

धानोरा येथे जागतिक होमिओपॅथिक दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त (दि. 10 एप्रिल 2026) धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले असून विविध आजारांवर होमिओपॅथी पद्धतीने औषधोपचार करण्यात आले.
याच अनुषंगाने इंदिरानगर, धानोरा येथील अंगणवाडी केंद्रात स्तनदा माता, किशोरवयीन मुली व स्थानिक नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Homoeopathy for Sustainable Health या संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत आरोग्याचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी डॉक्टर मंजुषा लेपसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, होमिओपॅथी ही उपचार पद्धती केवळ तात्पुरता आराम देत नाही, तर शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवून दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यावर भर देते. ही पद्धत नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. निशांत बांबोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सीमा गेडाम, डॉ. शीतल टेंभुर्णे, डॉ. सुनीता नरडगे, डॉ. शेख तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश लेंनगुरे यांनी केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये होमिओपॅथीबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here