Kurkheda : पाणपोई सुरू करुन जोपासली सामाजिक बांधीलकी
– संकल्प फाऊडेंशनचे संस्थेचे कार्य समाजपयोगी
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. २६ : संकल्प फाऊंडेशन संस्थेचे सामाजिक कार्य निश्चितपणे समाजपयोगी असल्याचे प्रतिपादन शहर विचार मंच चे अध्यक्ष माधवदास निरंकारी यांनी केले. कार्यक्रमादरम्यान माजी आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र तथा चांगदेव फाये भाजपा तालुका अध्यक्ष कुरखेडा यांनी भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
राम नवमी चे औचित्य साधून कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथे संकल्प फाऊंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जनसेवार्थ पाणपोई चे उदघाटन माधव दाजी निरंकारी शहर विचार मंच अध्यक्ष यांचे शुभ हस्ते करण्यात आले. जनसेवार्थ पाणपोईचा उद्घाटन बस स्थानक गेवर्धा येथे करण्यात आला त्यावेळी उदघाटक म्हणून बोलत होते.
गेल्या ९ वर्षांपासून संस्थेच्या वतीने हा उपक्रम चालविण्यात येत आहे,
गेवर्धा हे गाव केंद्र ठिकाणी असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र तथा को-ऑपरेटिव्ह बँक येथील ग्राहक, परिसरातील प्रवाशांची व आठवडी बाजारला येणाऱ्या नागरिकांची सुद्धा मोठी वर्दळ असते, बस स्थानकच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे वाटसरू व प्रवाश्याना तहान भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. हि बाब लक्षात घेऊन संकल्प फाऊंडेशन सस्थे तर्फे समाज उपयोगी जनसेवार्थ पाणपोई चा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे संपूर्ण उन्हाळ्याभर सदर उपक्रम चालविण्यात येणार आहे.
पाणपोईच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी रवींद्र गोटेफोडे माजी नगराध्यक्ष होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य पी. एस.खोपे, राजेश उईके, प्रतिष्ठित नागरिक डॉ. टिकारामजी बोरकर, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश बोरकर, पो.पा.भाग्यरेखा वझाडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे, माजी ग्रा.पं.सदस्य सुनील किन्नाके, मधुकर पाटील शेंडे, बाजार व्यापारी जावेदभाई शेख, निजामुद्दीन शेख, नाट्य कलावंत मयूर चन्ने, देवराव सुकारे, भुवनेश्वर कांबळे, डाकराम मैन्द, ,लिपिक कृष्णा मस्के, बबन राऊत, भावेश कांबळे, बाळकृष्ण नखाते, संजय मैंद, लोकेश ठाकरे, सुमेध रामटेके, जितू वट्टी, मनीष मेश्राम, अतुल अंबादे, गोविंद बोरकर, संकेत कुथे, मुकेश बोरकर, नितेश नखाते, फलींद्र मांडवे, राहुल पाटणकर, नितेश नखाते, बाळकृष्ण नखाते, भूषण बोरकर, जितेंद्र वटि, रामकृष्ण बोरकर, संकेत कुथे, देवा नाकतोडे, स्नेहाली बोरकर इत्यादींनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर बाळबुद्धे यांनी तर आभार राजू बारई तंटामुक्ती अध्यक्ष यांनी मानले.













