मुरूमगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक संमेलन उत्साहात

123

मुरूमगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक संमेलन उत्साहात
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक संमेलन व महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम सांस्कृतिक संमेलन समिती मुरूमगाव, ग्रामपंचायत मुरूमगाव व जनकल्याण महिला ग्रामसंघ मुरूमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शैलाताई कवाडकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील मेहर (प्रांत सेवा प्रमुख), शिवप्रसाद गवर्ना (सरपंच), अजमन रावते (माजी सभापती, पंचायत समिती धानोरा), लताताई पुंगाटे (माजी जिल्हा परिषद सदस्य), कांबळे मॅडम (आश्रम शाळा मुरूमगाव), बैसाखुराम कोटपरिया, चारुलता मार्गीया, कृष्णाबाई भक्ता, अंजूताई मैदमवार, रंजू गडपायले, ओम देशमुख, पार्वती गवर्ना व बिंदिया मडकाम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान महिलांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महिलांचे सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समरसता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत, नृत्य व विविध कलाविष्कारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला गावातील महिला, युवक, नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन उमेशकुमार मडावी यांनी केले, तर प्रस्तावना राकेश उईके यांनी मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चनाताई देशमुख, रिंकी निक्षक, रंजू टेंभुर्णे, कविता दामले, रेखा देहारी, प्रभाताई मेश्राम, वर्षा परिहार, श्यामबाई जाडे, डेव्हिड मेश्राम तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी चारुलता मार्गीया यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here