वाहन दरीत कोसळले ; १० जवान शहीद, अनेक गंभीर जखमी

117

वाहन दरीत कोसळले ; १० जवान शहीद, अनेक गंभीर जखमी
– भद्रवाह–चंबा महामार्गावरील खानी टॉपजवळ भीषण अपघात
The गडविश्व
डोडा, दि. २२ : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन देशासाठी सेवा बजावत असलेले १० लष्करी जवान शहीद झाले, तर इतर काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. भद्रवाह–चंबा आंतरराज्य महामार्गावरील खानी टॉप परिसरात लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनात १७ जवान होते. हे वाहन उंच भागातील एका लष्करी चौकीकडे जात असताना वळणदार आणि घसरणाऱ्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी वाहन थेट खोल दरीत कोसळले आणि क्षणार्धात भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत रेस्क्यू टीमला मोलाची मदत केली. अथक प्रयत्नांनंतर दरीतून १० जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर जखमी जवानांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
जखमींपैकी काही जवानांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, तीन जवानांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांना सर्वत्र श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ArmyAccident #Doda #JammuAndKashmir #IndianArmy #Martyrs #RescueOperation #KhaniTop #BhadarwahChambaHighway #NationalNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here