सायबर तपासातून मोठे यश : कुरखेडा पोलिसांनी हरवलेले-चोरीला गेलेले ११ मोबाईल मूळमालकांच्या हाती दिले
– २.०४ लाखांचा मुद्देमाल परत ; नागरिकांत समाधान
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०५ : कुरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल ११ मोबाईल संच सायबर गुन्हे तपास पथकाने शोधून काढत मोठे यश मिळवले आहे. सुमारे २ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचे हे मोबाईल मंगळवार, दि. ५ जानेवारी रोजी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे मूळमालकांना परत करण्यात आले.
हरवलेल्या मोबाईल बाबत दाखल तक्रारींच्या आधारे सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करण्यात आला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध ठिकाणांहून मोबाईल संच हस्तगत करण्यात सायबर तपास पथकाला यश आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. यावेळी ठाणेदार महेंद्र वाघ, सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम तसेच सहाय्यक शिपाई पंकज नवघरे, अमोल आलाम व राकेश येरणे उपस्थित होते.
याप्रसंगी रवींद्र भोसले यांनी आवाहन केले की, मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी तात्काळ ईएमआय क्रमांक व खरेदी बिलासह नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, जेणेकरून मोबाईलचा शोध जलदगतीने घेता येईल.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














