दखणे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरी

57

दखणे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरी
– विद्यार्थिनींकडून शाळा स्वयंशासन; मुख्याध्यापक–शिक्षिकांची भूमिका मुलींनी निभावली
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : धानोरा तालुक्यातील मुरुम येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुलींच्या नेतृत्वगुणांना व आत्मविश्वासाला चालना देणारा शाळा स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली. स्वयंशासन उपक्रमांतर्गत श्रद्धा दखणे यांनी एक दिवसासाठी मुख्याध्यापिका म्हणून कर्तव्य पार पाडले. तर भारती मडावी, विशाखा बैसरा, आरुषी उईके, संस्कृती कुंजाम, साक्षीत औरसा, कीर्ती मडावी आदी विद्यार्थिनींनी शिक्षिका म्हणून शैक्षणिक कामकाज यशस्वीरीत्या सांभाळले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम चिंचोलकर, सतीश सुरणकर, संतोष देशमुख, रामाधर राणा, सुरेश तुलावी, रमेश निसार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कीर्ती विश्वकर्मा यांनी केले, तर आभार कल्याणी भोयर यांनी मानले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष प्रशंसेचा विषय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here