नक्षल गडाला मोठा तडा ; चकमकीत १४ नक्षलवादी ठार
– दोन ठिकाणी वेगवेगळी चकमक
The गडविश्व
सुकमा / विशेष प्रतिनिधी, दि. ०३ : छत्तीसगडमध्ये सुरक्षाबळांनी राबवलेल्या नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम परिसरात १२ तर बीजापूर जिल्ह्यात २ नक्षलवादी अशा एकूण १४ नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत.
बीजापूरमध्ये माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी पथकाने शोधमोहीम सुरू केली. शनिवारी पहाटे नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक झाली. या ठिकाणी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या चकमकीची पुष्टी पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी केली असून, सुरक्षेच्या कारणास्तव ऑपरेशनचे तपशील सध्या जाहीर करण्यात आलेले नाहीत. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Chhattisgarh #NaxalAttack #Encounter #SecurityForces #AntiNaxalOperation #Sukma #Bijapur #Maoists #DRG #BreakingNews













