कुरखेड्यात “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत १५० झाडांचे रोपण
– पर्यावरण संवर्धनाचा हरित संदेश
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०९ : “एक पेड माँ के नाम” या राष्ट्रीय अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील क्रीडा संकुल परिसरात १५० झाडांचे रोपण करण्यात आले. हा उपक्रम वन विभाग आणि श्री स्व. स्वरूप संप्रदाय नानीज धाम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
या पर्यावरण संरक्षण मोहिमेत स्थानिक वन कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात क्षेत्र सहायक एस. एल. कंकलवार, वनरक्षक एस. डब्ल्यू. गोंनाडे, एम. के. दूधबडे तसेच विक्की गोबाडे उपस्थित होते.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे माता-पित्यांच्या स्मरणार्थ झाडे लावून हरित भारताचे स्वप्न साकार करणे आणि वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०२४ रोजी विश्व पर्यावरण दिनानिमित्त या अभियानाची सुरुवात केली होती. सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी झाडे लावण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले आहे.
कुरखेड्यातील हा हरित उपक्रम आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात पर्यावरण जनजागृतीचा एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे. स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत करत, अशा उपक्रमांमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













