‘आप’चा विजय : वनपट्टाधारक शेतकऱ्यांना दिलासा, फार्मर आयडी पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू

153

The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अर्ज रद्द होण्याच्या प्रकरणात आम आदमी पार्टीच्या निवेदनानंतर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात तहसीलमार्फत फार्मर आयडी पुनर्निर्माणाची व्यवस्था करण्याची घोषणा केली.
एग्रीस्टॅक प्रतिनिधीने स्पष्ट केले की, वनजमिनीवरील ७/१२ उताऱ्यांमुळे डेटाबेस मॅच न झाल्याने अर्ज रद्द झाले. आता अर्ज रद्द झालेल्या शेतकऱ्यांना आधार व मोबाईल क्रमांक सादर करून पुनःफार्मर आयडी मिळवता येणार आहे.
आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नासिर हाश्मी यांनी या प्रकरणात भेदभाव दूर करून सर्व शेतकऱ्यांना समान हक्क देण्याची मागणी केली. या वेळी जिल्हा संघटक ताहीर शेख, चेतन गहाणे, साहिल बोदेले, राहुल मेश्राम, रोहित गायकवाड आणि आदित्य ओंपाक उपस्थित होते.
प्रशासनाच्या या निर्णयाने वनपट्टाधारक शेतकऱ्यांमध्ये दिलासा आणि समाधानाची लहर पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #TheGadVishva #AAP #FarmerID #ForestLand #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here