धानोरा येथे रोगनिदान शिबीर व नि:शुल्क औषध वितरण

79

– शेकडो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २२ : धानोरा येथे दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट, गडचिरोली आणि डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रांगी रोडवरील पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय येथे रोगनिदान शिबीर व नि:शुल्क औषध वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, क्षयरोग यांसह विविध आजारांवरील तपासणी व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले. तसेच सिकलसेल, थॅलेसिमिया, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, ईसीजी यांसारख्या तपासण्याही मोफत करून घेण्यात आल्या.
या सामाजिक उपक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला व शिबिराच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, तालुका महामंत्री सुभाष धाईत, हेमंत राठी, अंकुश गोडलवार, बनपूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. मोरेश्वर राठोड, डॉ. अजिंक्य खंबाळकर, डॉ. प्रियांका शेडमाके, डॉ. विवेक हजारे, डॉ. प्रवीण रमेश, डॉ. सुरज मंडळ, डॉ. यश माने, डॉ. पार्थ टेकाळे, डॉ. राहुल धाडसे, डॉ. श्वेता गोडलवार, चेतन गणबोईनवार आदींनी सेवा बजावली.
या शिबिरात शेकडो नागरिकांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. आयोजकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanoaranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here