अतिदुर्गम भागातील २०३ स्पर्धकांचा मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग

246

– अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ९ डिसेंबर : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कृष्णार सह आठ गावांमध्ये गाव संघटनेच्या सहकार्याने रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २०३ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. त्यानंतर सभेचे आयोजन करून गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कृष्णार येथे रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये गावातील महिला, पुरुष, युवक , युवती असे एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेत गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला. या कार्यक्रमाला गाव संघटन प्रमुख जितेंद्र तेलामी, पांडू वाचामी यांनी सहकार्य केले. यासोबतच मिरगुडवांचा, हिंदेवडा, हितापाडी, दुबगुडा, धुडेपल्ली, राणीपोदूर, कोयनगुडा या गावातही मॅरेथॉन अयोजित करण्यात आली होती. अशा एकूण आठ गावात पार पडलेल्या स्पर्धेतून एकूण २०३ स्पर्धकांनी शक्तिप्रदर्शन केले.
दरम्यान, स्पर्धेचे रूपांतर सभेत करून अवैध दारू व तंबाखूविक्री विरोधी असलेल्या कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सोबतच दारुबंदीशिवाय गावाचा विकास शक्य नसल्याचे पटवून देण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ कार्यकर्ता आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) ( 203 contestants from remote areas participated in Muktipath Marathon)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here