सावली पं. स. सभापती विजय कोरेवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

284

– ५ मार्च रोजी पुणे येथे होणार सत्कार
The गडविश्व
सावली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य द्वारा देण्यात येणारा उत्कृष्ट सभापती कामगिरी पुरस्कार सावलीचे पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी पुणे येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत नेतांना ग्रामपंचायतीसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या कामगिरीची नोंद व्हावी याकरीता असोसिएशनचे वतीने प्रथमच अशा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातून विशेष कामगिरी करणाऱ्या ३ पंचायत समिती सभापतीना पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी कोरोना काळात रक्तदान शिबिर, विलगिकरणातील मजुरांची काळजी, लसीकरण करण्यासाठी प्रयत्न व शाळा सुरू करण्यासाठी केलेले विशेष काम व इतर कार्यात केलेली कामगिरीमुळे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. ५ मार्च रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी उपस्थित राहण्याचे पत्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पत्राद्वारे कोरेवार यांना कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here