सावली : आर्मी युवा सैनिकाच्या निधनाने तालुक्यासह सर्वत्र हळहळ

272

The गडविश्व
सावली : दिल्ली येथे आर्मी मध्ये कार्यरत असलेले सावली तालुक्यातील सादागड येथील युवा सैनिक आशिष जनार्दन मंगाम (२७) यांच्या पोटात अचानक दुखत असल्याने त्यांना रुगालयात उपचाराकरिता दाखल केले असता आज उपचार दरम्यान निधन झाले. तालुक्यातील युवा सैनिकांची निधनाची वार्ता
कुटुंबासह तालुक्यात पसरताच तालुक्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील सादागड येथील आशिष जनार्दन मंगाम (२७) हा युवक २०१४ ला आर्मी मध्ये भरती झालेला होता. ते दिल्ली येथे कार्यरत होते दरम्यान काल
अचानक त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना काल उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती आर्मी विभागाकडून सैनिकाच्या कुटुंबियांना कळविण्यात आली. निधनाची वार्ता गावात पसरताच तालुक्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त काण्यात येत आहे. सदर युवा सैनिक हे अविवाहित असून त्याच्या पाठीमागे आई-वडील, भाऊ असा बराच आप्तपरिवार आहे.
अतिशय होतकरू व खेळाडू असलेला हा युवक २०१४ मध्ये आर्मी मध्ये भरती झालेला होता. कर्तव्यावर असतांना तो त्या ठिकाणी स्पोर्ट साठी प्रसिद्ध होता. दिल्लीला आर्मी मध्ये काम करत असतानाच तो स्पोर्ट साठी मेरठ येथे आलेला होता. अचानक त्याला पोट दुखीचा त्रास वाढल्यामुळे त्यांना उपचाराकरिता तेथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्या विभागाने त्यांच्या परिवाराला दिली होती. दरम्यान आज सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाल्याची माहिती कुटुंबाला देण्यात आली असता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर सैनिकाचे प्रेत आज सावली सावली तालुक्यातील सादागड कडे त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या परिवाराला संबंधित अधीकारी, सैनिकांकडून देण्यात आलेली आहे.
सदर घटनेची माहिती सावली पं.स. सभापती विजय कोरेवार यांना गावकऱ्यांनी दिली असून युवा खेडाळू व चांगला सैनिक गमावल्याचे दुःख सभापती विजय कोरेवार यांनी व्यक्त केले आहे. सैनिकांच्या मृत्यूमुळे सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here