गडचिरोली येथे संशयित हृदयरोग बालकांची इको तपासणी शिबीर संपन्न

208

The गडविश्व
गडचिरोली, १५ सप्टेंबर : जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ‘द्वितीय स्तरीय संदर्भसेवा कक्ष’ म्हणून डीईआईसी (DISTRICT EARLY INTERVENTION CENTRE) जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून ० ते १८ वर्षे वयोगटातील 4D’s तपासणी नुसार आढळून आलेले बालके/विद्यार्थी यांना संदर्भित केले जाते.

डीईआईसी येथे नोंदणी व निदान निश्चिती करिता तपासणी करून गरजेप्रमाणे डीईआईसीतील उपलब्ध थेरेपी व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भसेवा दिली जाते. डीईआईसी-आरबीएसके तर्फे १३ व १४ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय वैद्यकीय अधीक्षीका डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली ओपीडी हॉल जिल्हा रुग्णालय येथे संशयित जन्मजात हृदयरोग आजाराच्या बालकांकरिता ‘इको तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिराकरिता किंग्सवे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय नागपूर येथील तज्ञ कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रणित लाले हे उपस्थित झाले तसेच जिल्हा रुग्णालय येथील डॉ. धुर्वे, आरएमओ, डॉ. नागदेवते, फिजिशिअन, डॉ. मनीष मेश्राम, सायकॅट्रीक, बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल चव्हाण व डॉ. तारकेश्वर उईके, डॉ. प्रणव मांडवे उपस्थित होते.
शिबीरा दरम्यान पहिल्या दिवशी Surgical 25, Non surgical 56 व दुसऱ्या दिवशी Surgical 30, Non surgical 69. असे दोन्ही दिवसाचे Surgical 55 व Non Surgical 125 अशा रुग्णाची तपासणी करण्यात आली.
दोन दिवसीय शिबिरातील एकूण १८० बालके/विद्यार्थी यांची इको तपासणी करण्यात आली. मुख्य म्हणजे दोन्ही दिवस जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वेळात वेळ काढून स्वतः सुद्धा बालकांची तपासणी केली. पात्र बालकांना तृतीय स्तरावर संदर्भ सेवेकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य स्तरावरून सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयामध्ये संदर्भित करून पालकांना विनामूल्य शस्त्रक्रियेकरिता आरबीएसके-डीईआईसी तर्फे नियोजन होणार आहे.
सदर शिबीर आरबीएसके वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, डीईआईसी अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here