कुरखेडा : रानटी डुकराच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेला मजूर गंभीर जखमी

1991

– रानटी हत्तीसोबत, वाघ, रानटी डुकराची तेंदूपत्ता तोडणाऱ्यांमध्ये दहशत
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : तालुक्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. अशातच तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या मजुरावर रानटी डूकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील चारभट्टी जवळ असलेल्या कोटलडोह च्या जगंलात १५ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. रतिराम तूळशीराम नरेटी (वय ५३) रा.चारभट्टी असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला आहे. चारभट्टी येथील रतिराम नरेटी व इतर मजूर कोटलडोह जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडत असताना अचानक रानटी डूकराने रतिराम नरेटी यांच्यावर हल्ला चढवला. बाचावाकरिता त्यांनी आरडा ओरड केली असता आजूबाजूला असलेले इतर मजूर धावून आले असता डुकराने तिथून पळ काढला. मात्र या झटापटीत नरेटी यांच्या हात आणि पायावर गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या मजुरास शासासनातर्फे मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने जंगलालगतच्या गावातील नागरिक तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. अशातच वन्यप्राण्यांचे हल्ले तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर होताना दिसत आहे. यापूर्वी अनेक घटना पुढेही आल्या आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करताना उचित खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
(#thegdv #thegadvishva #kurkheda #charbhatti #gadchirolinews #kurkhedaforest #puradafoest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here