The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.१५ : तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मोहली येथील कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक वर्गणीतून गोळा केलेली राशी कँन्सरग्रस्त व अपघातग्रस्त गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी रूपये ५ हजार प्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन पालकांशी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली व त्यानंतर शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक दिनकर नरोटे यांचे शुभहस्ते मदतीचे पाकीट सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक डी.बी.वटटी, व्ही.डी.ब्रम्हटेके, कु.एस.पी.हेमके, सौ.एस.पी.बुराडे,बी.पी.राऊत, एस.पी.वैरागडे, आणि सौ.पी.के.आनंदवार आदि प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेतील इयत्ता ६वी मध्ये शिकणारा विद्यार्थी श्रेयस सुधाकर पदा रा.कन्हाळगांव मागील काही महिन्यांपासून कॅन्सर पिडीत आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लाखो रुपयांचा उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. स्थानिक मोहली गावातील अनमोल चंद्रमणी मेश्राम इयत्ता ९वीमध्ये शिकणारा शाळेचा दिव्यांग विद्यार्थी असून मागील महिन्यात शाळेच्या मैदानात अचानकपणे खाली घसरून पडल्याने त्याचा डावा हात मोडला आहे. सदर बाब लक्षात घेऊन शालेय परिवाराने मानवतेच्या दृष्टिकोनातून एक सहकार्याची भावना जोपासत उदात्त हेतूने त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक आर्थिक मदतीचा हात म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहचता करण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांचे आंतरीक मनोबल उंचावले आहे व त्यांनी सहकार्यासंबंधी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #mohali )