रांगी बायपास मार्गावरील मोरी फुटुन तयार झालेले खड्डे अपघाताला देत आहेत निमंत्रण

350

– अवघ्या दोन महिन्यातच मोरी बांधकाम फुटले

The गडविश्व
धानोरा, २९ जुलै : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रांगी बायपास मार्गावर जुन २०२२ मधे नव्याने बांधकाम केलेल्या पुलाचा भाग खाली दबल्याने दोन मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सध्यातरी या मार्गाची रहदारी बंद पडली असली तरी रात्री येणाऱ्या वाहनाना येथील दोन्ही खड्डे अपघाताला निमंत्रण देनारेच असल्याने सदर समस्सेची वेळीच दखल घेवून रस्ता सुरळीत करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी व वाहन धारकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग धानोरा अंतर्गत येत असलेले मोहली ते वैरागड मार्गाचे काम मागिल चार वर्षापूर्वी पासुन चालु होते. परंतु कंत्राटदाराने वेळीच काम न केल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाहन धारकांना, प्रवाशांना, विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना सोसावा लागला. याच मार्गावर बैस व ग्रामपंचायतची बोळी यांच्यामधे रांगी बायपास रोडावर नव्याने मोरी बांधकाम करण्यात आले. ते दोन महीन्यापुर्वी मोरीच्या बाधकामा नंतर त्यावरुण डांबरीकरण करण्यात आले. मात्र कच्च्या बांधकामामुळे मोरी फुटून भलेमोठे दोन खड्डे पडल्याने वाहनाकरिता सध्यातरी हा रस्ता निकामि झालेला आहे .येथे पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देनारेच आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वेळीच दुरुस्त करुण मार्ग नियमित करून द्यावे शी मागणी परिसरातील नागरिक व वाहन धारकांकडून केल्या जात आहे. दोन महीन्यापुर्वी बांधलेले मोरी बांधकाम फुटलेच कसे हा मात्र संशोधनाचा विषय आहे. त्यात योग्य प्रमाणात सिमेट वापरले काय ? सळाख कोणती वापरली ? बांधकाम करताना गिट्टी कोणती वापरली ? याचा संबंधित विभागाने चौकशी करुण दोषिवर कारवाई करण्याची मागणीहि जनतेनी केली आहे. गावाबाहेरील मार्गावरुण लोकांची  वर्दळ असते तसेच दोन चाकी व चार चाकी वाहने दिवस रात्र चालत असतात .गावातिल नागरिक, बैलबंडीची ने-आण असते. रात्री च्या वेळी अंधारात पावसात या मोरीवरुण जाताना अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा सवालही गावकरी विचारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here