मादगी समाजाला प्रलंबित शिष्यवृत्तीसह इतर शैक्षणिक सोयीसुविधा द्या : प्रदेशाध्यक्ष दिपक बोलीवार

239

– जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

The गडविश्व
गडचिरोली : मादगी समाजातील विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीसह इतर शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात याव्या अशी मागणी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हा परीषद व हायस्कुल मध्ये शिक्षण घेणाऱ्या व अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना जिल्हा परीषदेच्या समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती दिल्या जाते. परंतु संबंधित घटकातील विद्यार्थ्यांना सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती देण्यात यावी आणि समाजाच्या विद्यार्थ्यांना विकासाच्या गंगेत आणण्यासाठी वस्तीगृहाच्या किमान ५ जागा आरक्षीत ठेवण्यात यावे अशी मागणी अखील भारतीय मादगी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक बोलीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतिने राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे निवेदनातून केली आहे.
मादगी समाज हा अनुसूचित जाती या प्रवर्गात मोडत असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सुध्दा या समाजाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. त्यामुळे शैक्षणिक सोयी, सुविधा व शिष्यवृत्ती वेळच्या वेळी देवून तसेच प्रलंबित असलेली शिष्यवृत्तीत वाढ करून द्यावी, पाल्यास उच्च शिक्षण किवा बाहेरगावी शिकवताना अनेक समस्या निर्माण होत असतात म्हणून सामाजिक न्याय विभागातंर्गत येणाऱ्या वसतीगृहात ५ जागा आरक्षित ठेवण्यात यावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
निवेदन देताना अखील भारतीय मादगी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक बोलीवार, जिल्हा प्रभारी विजय देवतळे, जिल्हाध्यक्ष वनिता पोहरकर, जिल्हा सचिव किशोर नरुले, ऐश्वर्या गंगासागर,अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here