भगवान बिरसा मुंडा चे आदर्श आदिवासी समाजाने जपावे : प्रवीण गेडाम

209

– हिरापुर येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
The गडविश्व
ता.प्र / सावली, २० नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती सावली तालुक्यातील हिरापूर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आली.
बिरसा मुंडाणे ब्रिटिशा विरुद्ध उलगुलान करून हमारे देश मे हमारे राज मावा माटे मावा राज ही संकल्पना घेऊन बिरसा मुंडा नी , ब्रिटिशांना सडो कि पडो केले मात्र समाजातील व्यक्ती फितूर झाल्याने भगवान बिरसा मुंडा ना ब्रिटिशांनी पकडून फाशीची शिक्षा देण्यात आली जल जंगल जमिनीचा खरा आदिवासी हा मालक असून आदिवासी होत असलेल्या अत्याचाराला बडी न पडता बिरसा मुंडाणे इंग्रजा विरुद्ध बंड पुकारला त्यामुळे बिरसा मुंडा ना पकडून फाशी देण्यात आली त्यांचा मृत्यू ९ जून १९०० ला झाला. या पंचवीस वर्षात केलेल्या ब्रिटिश राजवटी विरोधात क्रांतीला न विसरता आदिवासी समाजाने जननायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचे आदर्श जपून आदिवासी समाजाने सामाजिक कार्य करावे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास आत्राम औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर, उद्घाटक आरोग्य विस्तार अधिकारी फाल्गुन आत्राम, दीपप्रज्वलन नथू शेडमाके, तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या योगिता ताई पेंदाम (डबले) , मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, रघुराज शेडमाके समाज अध्यक्ष, आयोजक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, आणि आदिवासी महिला भगिनी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी दोन वाजता भव्य दिव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर सल्ला घागरा पूजा मग मार्गदर्शन कार्यक्रम आणि रात्रोला विद्यार्थ्याचे रे ला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here